धरणगाव : धरणगाव पोलिसात हाणामारी प्रकरणी टहाकळी येथील चौघांविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला होता. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने संशयीत चौघा आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
चौघांची निर्दोष मुक्तता
धरणगाव पोलिसात संशयीत पिता-पूत्रांना मारहाण केल्याप्रकरणी समाधान सदार्वेत यांनी तक्रार नोंदवली होती. त्यानुषंगाने संशयीत महेंद्र लक्ष्मण सदावर्ते, संतोष अशोक सदावर्ते, कल्पेश प्रल्हाद गजरे, शरद अशोक सदावर्ते (रा.टहाकली ता.धरणगाव) यांच्या विरोधात भांदंवि 325, 504, 506 सह 34 प्रमाणे गुन्हा दाखल होता. धरणगाव न्यायालयाचे न्या.अविनाश ए. ढोके यांच्या न्यायासनापुढे खटल्याचे कामकाज चालल्यानंतर संशयीतांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. बचाव पक्षातर्फे अॅड.मनोज दवे यांनी बाजू मांडली.