एरंडोल – एरंडोला 6 सप्टेंबर रोजी झालेल्या युवकांच्या दोन गटात झालेल्या हाणामारीतील पोलिसांनी आज पुन्हा दोन संशयिताना अटक केली. अमळनेर दरवाजा परिसरातील प्रा.मनोज पाटील यांच्या निवासस्थानाजवळ युवकांच्या दोन गटात हाणामारी झाली होती. यातील पंकज नेरकर, पवन महाजन, भरत महाजन, राहुल उर्फ केटली महाजन याना 7 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती.त्यांची पोलीस कोठडी काल संपल्यामुळे सर्व संशयितांना न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता सर्वांना पुन्हा तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश नितेश बंडगर यांनी दिला. तर दुसरे संशयित माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्याना आज न्यायालयासमोर उभे करण्यात येणार आले. दशरथ महाजन याना देखील दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायाधीश नितेश बंडगर यांनी दिला. तर दुसऱ्या गटातील सर्व संशयितांची यापूर्वीच जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान हाणामारी प्रकरणी आज पोलिसांनी रितेश उर्फ छोटू रामा महाजन व स्वप्निल प्रसाद महाजन दोन्ही रा.माळीवाडा रा.एरंडोल याना शनिवारी अटक केली असुन त्याना रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.