हातपंप बंदमुळे पाण्याविना गावकर्‍यांचे हाल

0

शिरपूर । तालुक्यातील जुना व नवा चांदसूर्या येथे गेल्या 2 महिन्यापासून हातपंप व बोरवेल बंद असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वण वण होत आहे. सदर ग्रामस्थांनी त्या बाबत भाजपा पदाधिकारी हेमंत पाटील हेमराज राजपूत यांच्या कडे या गंभीर प्रकाराची तक्रार केली. त्यानुसार भाजपा कार्यकर्त्यांनी तात्काळ गटविकास अधिकारी पंस (इऊज) शिरपुर येथे भेट घेऊन वरील प्रकाराची तक्रार दिली. यावेळी ग्रामस्थांनसह भाजपा शहर अध्यक्ष हेमंत पाटील ,यु.मो.जि.उपाध्यक्ष हेमराज राजपूत जि.चिटणीस चंद्रकांत पाटील (शिंगावे) यांनी चर्चेदरम्यान तक्रार केली व सदर हातपंप व बोरवेल 48 तासात सुरू ना झाल्यास थेट चांदसूर्या येथून बंद असलेला हातपंप उखडून आणून पंचायत समितीतील अधिकार्‍यांचा दालना समोर गाडण्यात येयील असा इशारा हेमंत पाटील व भाजपा पाधिकार्‍यांनी पंचायत समिती प्रशासनाला दिला.