जळगाव : दूध फेडरेशनजवळून हातभट्टीची गावठी दारुची वाहतूक करणार्या दोघांवर मंगळवारी शहर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून दोन हजारांच्या दारूसह 20 हजार रुपये किंमतीची दुचाकी जप्त केली. संशयीतांविरोधात जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शहर पोलिसात दोघांविरोधात गुन्हा
शहरातील दूध फेडरेशनजवळून हातभट्टीची गावठी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती जळगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईच्या सूचना केल्या होत्या. विजय निकुंभ, प्रफुल्ल पाटील, प्रणेश ठाकूर, राजकुमार चव्हाण यांच्या पथकाने दूध फेडरेशन परीसरात सापळा रचून दुचाकी (एम.एच. 19 व्ही.1943) वरील हिरालाल महारु कोळी (22) व सचिन महारु कोळी (22, दोन्ही रा.भोलाणे, ता.जळगाव) यांना ताब्यात घेतले. संशयीतांकडील दोन हजार रुपयांची गावठी दारु व 20 हजारांची दुचाकी मिळून 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.