हायड्रोक्सीक्लोरोक्वीन गोळ्यांच्या बदल्यात अमेरिका भारताला देणार हारपून मिसाइल आणि टॉरपीडोस!

0

वॉशिंटन – अमेरिका भारताला अत्यंत घातक मानल्या जाणार्‍या हारपून ब्लॉक दोन एअर मिसाइल आणि टॉरपीडोसची विक्री करणार असल्याची माहिती निर्णयाची माहिती ट्रम्प प्रशासनाने सोमवारी दिली. गेलल्या आठवड्यात भारताने अमेरिकेला हायड्रोक्सीक्लोरोक्वीन (एचसीक्यू) या गोळयांचा पुरवठा केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करुन पंतप्रधानांचे आभार मानले व हे उपकार कधी विसरणार नाही असे म्हटले होते. त्यानंतर आता ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन काँग्रेसला भारताला मिसाइल, टॉरपीडोस विकणार असल्याच्या निर्णयाची माहिती दिली. ही एकाप्रकारे उपकाराची परतफेड मानली जात आहे.
डिफेन्स सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सीने दोन वेगवेगळया अधिसूचना काढून काँग्रेसला ही माहिती दिली. हारपून मिसाइल सिस्टिम P-8I विमानामध्ये बसवली जाते. भारताने आपल्या नौदलासाठी ही विमाने अमेरिकेकडून आधीच विकत घेतली आहेत. सध्या टेहळणीसाठी या विमानांचा वापर सुरु आहे. P-8I विमानामधून पाणबुडीवर अत्यंत अचूकतेने हल्ला केला जाऊ शकतो. बोईंग कंपनी हारपून मिसाइलची निर्मिती करणार आहे तर टॉरपीडोसचा रेथीऑन कंपनीकडून पुरवठा केला जाणार आहे.