लंडन । आफ्रिकेचा फलंदाज हाशिम आमलाने भारताचा कर्णधार विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात आमलाने 7 हजार धावांचा टप्पा पार करताना सर्वात कमी सामन्यांमध्ये ही कामगिरी करण्याचा विक्रम केला. आमलाने इंग्लंडविरुद्ध 23 वी वैयक्तिक धाव घेतल्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा टप्पा गाठला. यासाठी त्याने केवळ 150 डाव खेळले हे विशेष.
हीच कामगिरी कोहलीने 161 डावांमध्ये केली होती. आमलाने याआधी कोहलीचा सर्वात जलद 6 हजार धावा उभारण्याचा विक्रमही मोडला होता. त्याचबरोबर सर्वात कमी डावांमध्ये 2 हजार, 3 हजार, 4 हजार आणि 5 हजार धावा काढण्याचा विक्रमही आमलाच्याच नावावर आहे.