खान्देश नाट्य महोत्सवाची शहरात सांगता
भुसावळ- शहरातील पु.ओ.नाहाटा महाविद्यालयात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या खान्देश नाट्य महोत्सवाची रविवारी ‘मराठी वाङमयाचा घोळीव इतिहास’ या पु.ल.देशपांडे लिखित हास्यस्फोटक दीर्घांकाने सांगता झाली. मुकेश माचकर यांनी लिहिलेल्या आणि मंगेश सातपुते यांनी दिग्दर्शित केलेल्या या एक तास दहा मिनिटांच्या नाटकाला भुसावळकरांनी भरभरूनन प्रतिसाद दिला. पुलंच्या काही परीचित व्यक्तीरेखांच्या माध्यमातून समकालीन वास्तव आणि गाळीव इतिहास यांची सांगड घालत पुस्तकातील गंमत या दीर्घांकातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला. भुसावळातील रसिकांना तो भावला.
भुसावळकर रसिक लोटपोट
उत्कर्ष कलाविष्कार भुसावळ आयोजित स्व. देविदास गोविंद फालक स्मृती खान्देश नाट्य महोत्सवात रविवारी नाट्य महोत्सवाला शुक्रवारपासून नाहाटा महाविद्यालयात सुरुवात झाली. यातील तिसर्या दिवशी पार्थ थिएटर मुंबईच्या पु.ल.देशपांडे यांच्या मराठी वाङमयाचा घोळीव इतिहास या बहारदार पुस्तकाची घोळीव ओळख करुन देणारा हास्यस्फोटक दीर्घांक सादर करण्यात आला. पु.ल.देशपांडे यांची एक बहारदार साहित्यकृती मौज मध्ये प्रकाशित आहे. एका दीर्घलेखाचा हे पुस्तक रुपांतर त्यातल्या सखोल, वाड़मयीन चिंतनगम्य विनोदाने गाजले. त्यापुढचे लेख पुलंना प्रकृती अस्वास्थामुळे आणि वार्धक्यामुळे लिहिता आले नाहीत. पण त्या एका लेखातूनही पुलंच्या विनोदाची झेप लक्षात येते. पुलंच्या जन्मशताब्दी निमित्त या पुस्तकाचा आणि त्यातल्या गंभीर विनोदाचा नव्या पिढीला परीरचय व्हावा, या हेतूने पार्थ थिएटर मुंबई यांनी पुस्तकावर आधारीत नाटक सादर केले आहे. समारोपावेळी रमण इंगळे, रघुनाथ सोनवणे, डॉ.जतीन मेढे, ब्रिजेश लाहोटी आदी उपस्थित होते.