हा तर फक्त ट्रेलर

0

मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसवर शरसंधान

मुंबई । त्रिपुरातील आणि नागालँडमधील हा विजय म्हणजे फक्त एक ट्रेलर आहे. कर्नाटकातही भाजपला एकहाती सत्ता मिळेल. मोदींनी दिलेला विकास व विश्‍वास, अमित शहांचं संघटन, यामुळे भाजपला हे यश मिळाले, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. भाजपच्या विजयोत्सवानिमित्त दिली. पत्रकारांशी ते बोलत होते. तीनही राज्यांत जनतेने 49 ते 50 टक्के मते दिली आहेत.

काँग्रेसने पोटनिवडणुका लढवाव्यात!
मोदींच्या नेतृत्वावर जनतेने विश्‍वास दाखवलाय. आदिवासी समाजाने मोदींवर मोठा विश्‍वास दाखवला आहे. देशात ’डावे’ फक्त नावाला उरले आहेत. काँग्रेसने फक्त पोटनिवडणुकाच लढवाव्यात, कारण इतर निवडणुकीत ते विजयी होऊ शकत नाहीत, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसला टोला लगावला. एकात्मतेची भावना तयार करण्यात मोदींना यश आलं. मोदींचा विकासाचा मंत्र आणि अमित शहा यांचं कुशल संघटन कौशल्य यामुळे कार्यकर्ते जोडले गेल्याचे फडणवीस म्हणाले.