हिंगणेत निवडणूक वादातून पिस्टल लावत मारण्याची धमकी

In Hingane, the threat of firing a pistol over an election dispute जामनेर : जामनेर तालुक्यातील हिंगणे बुद्रुक येथे मंगळवारी गावातीलच एकाने माजी सरपंचाच्या छातीवर बंदूक लावत ठार मारण्याची धमकी दिल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अनिल राजाराम चौधरी यांच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडित गोसावी, तुषार संजय गोसावी (दोघे रा. हिंगणे, ता.जामनेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

निवडणूक वादातून लावली बंदुक
मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास हिंगणे बुद्रुक येथील माजी सरपंच अनिल चौधरी हे गावात असताना ज्ञानेश्वर उर्फ नाना पंडीत गोसावी याने त्यांच्या छातीला बंदूक लावून धमकी दिली तर त्याच्यासोबत असलेला तुषार संजय गोसावी याने कॉलर पकडून चापटा-बुक्यांनी मारहाण केली. यावेळी नागरीक जमा झाल्याने दोघांनी पळ काढला.

गुन्हा दाखलसाठी नागरीकांचा ठिय्या
चौधरी यांच्या फिर्यादीवरुन ज्ञानेश्वर गोसावी व तुषार गोसावी यांचे विरुध्द भादंवि कलम 307, 323 शस्त्र कायदा 3/25, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक दिपक मोहीते तपास करीत आहे. उदरम्यान, संशयीतांना अटक करण्यासह गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी नागरीकांनी जामनेर पोलिस ठाणे आवारात ठिय्या आंदोलनही केले.