जळगाव : यावल तालुक्यातील हिंगोणा (hingona) गावातील तरुणाचा जळगाव शहरातील बुलेट शोरूरजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेने मृत्यू झाला. हा अपघात रविवार, 27 फेब्रुवारी रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास सुमारास घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला. सागर विजय राणे (30, रा.हिंगोणा, ता.यावल, ह.मु.जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
परतीच्या प्रवासात क्रुर काळाची झडप
सागर राणे (sagan rane) हा तरुण जळगाव शहरात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्यास असून शनिवार. 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी तो कामाच्या निमित्ताने दुचाकीने हिंगोणा येथे राहत्या घरी गेला व त्यानंतर रात्री दुचाकीने परत जळगावकडे येत असताना मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास जळगाव-भुसावळ मार्गावरील बुलेट शोरूमच्या समोरून शहरात येत असतांना अज्ञात चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. या संदर्भात एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह जिल्हा शासकीय शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांकडे देण्यात आला.