हिंगोण्यात किरकोळ कारणावरून हाणामारी ; दंगलीचा गुन्हा

0

फैजपूर- यावल तालुक्यातील हिंगोण्यात मागील भांडणाच्या किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारी झाल्याने दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारीवरून 13 जणांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गुरुवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही हाणामारी झाली. हिंगोणा येथे घरातील मागे घडलेल्या किरकोळ भांडणावरून हाणामारी झाली. त्यात प्रथम दगडाबाई सुरेश बोदडे यांनी तक्रार दिल्यावरून श्रीधर पाहुणू भालेराव, विलास भालेराव, कुंदन भालेराव, दीपक भालेराव, विकास भालेराव, माधव भालेराव ,रणजीत भालेराव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात पती सुरेश बोदडे यांना मागील कारणावरून मारहाण झाल्याचे म्हटले आहे तर दुसर्‍या गटातर्फे आशा माधव भालेराव यांनी फिर्याद दिली. यावरून रामचंद्र रूपचंद बोदडे, सुरेश बोदडे, दगडाबाई बोदडे, योगेश बोदडे, कुसुम बोदडे, सीमा बोदडे या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यातही पती माधव भालेराव व पुतण्या विलास भालेराव यांना मागील भांडणावरून मारहाण झाल्याचे म्हटले आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम हेड कॉन्स्टेबल उमेश पाटील, राजू बराटे तपास करीत आहेत.