फैजपूर- हिंगोणा शिवारातील उभ्या केळीच्या पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याने शेतकर्याचे तब्बल सहा लाख 80 हजारांचे नुकसान झाले. या प्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. शेतकरी जितेंद्र मुरलीधर राणे यांचे हिंगोणा शिवारातील गट नंबर 1258 मध्ये शेत असून त्यात तयार केळीचे पीक उभे असताना 31 मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास वीज कंपनीच्या तारांमध्ये घर्षण होवून तारांचा लोळ पडल्याने केळीला आग लागली. या आगीत सहा लाखांचे केळी, 60 हजारांच्या ठिबक नळ्या तर 20 हजारांचे पीव्हीसी पाईप मिळून सहा लाख 80 हजारांचे नुकसान झाले. तपास एएसआय हेमंत सांगळे करीत आहेत.