कॉपीमुक्त अभियानाचा शहरात पुरता उडाला फज्जा
भुसावळ– बारावी परीक्षेत कॉपीमुक्त अभियानाचा शहरात पुरता फज्जा उडाल्याचा प्रत्यय दुसर्या दिवशी गुरुवारीही शहरवासीयांला आला. पहिल्या दिवशी बुधवारी इंग्रजीच्या पेपराला पाच विद्यार्थी डीबार झाल्याची घटना ताजी असतानाच गुरूवारीदेखील दोन विद्यार्थी डीबार झाले. शहरातील बी.झेड.उर्दू हायस्कूलमधील दोन विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील यांनी डीबार केले.