मुंबई। चॅम्पियन्स करंडक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तानचे क्रिकेट संघ एकमेकांसमोर बर्याच कालावधी नंतर उभे ठाकणार आहेत. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना ही एक सुवर्ण संधी असणार आहे. दोन्ही देशासाठी हा सामना हाय-व्होल्टेज असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहेत.
हा क्रिकेट सामना आणखी एका गोष्टीमुळे महत्त्वाचा ठरणार आहे. या सामन्याचे समालोचन क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर करणार आहे. एखाद्या क्रिकेट सामन्याचे समालोचन करण्याची ही सचिनची पहिलीच वेळ असेल. तो हिंदीत समालोचन करणार्या टीमचा भाग असेल. या टीममध्ये सचिनसह आकाश चोप्रा, सुनिल गावस्कर, साबा करीम आणि वीरेंद्र सेहवाग यांचा समावेश आहे.