चोपडा । येथील चोपडा तालुका राष्ट्रभाषा हिंदी अध्यापक मंडळाच्या नूतन कार्यकारीणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष ए.पी.पाटील यांच्या उपस्थितीत माजी अध्यक्ष पी.एन.पाटील (बिडगाव हायस्कूल) यांनी नूतन अध्यक्ष पवन लाठी (विवेकानंद विद्यालय) यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली.
नूतन कार्यकारिणी
अध्यक्ष-पवन लाठी (विवेकानंद विद्यालय), उपाध्यक्ष एस.एस. जाधव (कमळगाव हायस्कूल), सचिव व्ही.एस.महाजन (धानोरा), सहसचिव एस. आर.पाटील (नागलवाडी), संचालक जे.बी. जाधव, व्ही.ए. गोसावी, डी.ए.सूर्यवंशी, आय.आर.राजपूत, एस.आर.बारी, आर.के. माने, चेतना बडगुजर, व्ही.सी. पाटील, ए.बी.बाविस्कर, सल्लागार ए.पी.पाटील, सुधीर चौधरी, पी.एन.पाटील नूतन कार्यकारिणीचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा असून या कालावधीत हिंदी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी विविध कार्यक्रम राबविणार असल्याचा मनोगत अध्यक्ष पवन लाठी यांनी केला.