अखेर 16 जुलैच्या पहाटे गोवा पोलिसांना तोडफोड करणार्याला पकडण्यात यश आले. पोलिसांनी फ्रान्सिस परेरा या ख्रिस्ताला अटक केली. एका ख्रिस्ती व्यक्तीलाच याप्रकरणी अटक झाल्यामुळे गोव्यातील हिंदू समाजातील विशिष्ट संघटनांवर आरोप करून राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवणारी वक्तव्ये करणारे ख्रिस्ती धर्मगुरू, द गोवा सिटिझन्स अॅक्शन फोरम यांसारख्या ख्रिस्ती धर्मांध संघटना आणि तथाकथित निधर्मी माध्यमे हे सर्व तोंडघशी पडले आहेत. आपणच धार्मिक सलोख्याचे ठेकेदार असल्याप्रमाणे वावरणार्या या लोकांना आपल्या पूर्वग्रहदूषित वक्तव्यांमुळेच राज्यातील धार्मिक सलोख्याला बाधा येऊ शकते, एवढेही समजू नये?
तथाकथित धर्मनिरपेक्षवाले यांची असहिष्णुता!
सन 2004 पासून पुढील सहा वर्षे हिंदूंच्या मंदिरांतील मूर्तींची तोडफोड व्हायची. त्या वेळीही शेवटपर्यंत तोडफोड करणारा सापडला नव्हता. हिंदूंनी त्यावेळी बर्यापैकी संयम राखला. कारण ते सहिष्णू आहेत. अन्य राज्यांत हिंदूंच्या मंदिरांमध्ये गोमांस फेकणे, मूर्तींची तोडफोड करणे यांसारखे प्रकार धर्मांध करतात. त्यामुळे त्यांच्यावर संशय घेता येतो, पण गोव्यात धार्मिक द्वेषापोटी असे कधी झाले नव्हते. त्यामुळे अन्य धर्मीयांवर संशय घ्यावा, तर अल्पसंख्याकांची गळचेपी केल्याचा आरोप होईल, म्हणून सर्वजण गप्प बसायचे. त्यावेळी हिंदूंनी दाखवलेली सहिष्णुता ख्रिस्तींनी आणि हिंदूंमधील तथाकथित धर्मनिरपेक्षतावाल्यांनी क्रॉसची तोडफोड होऊ लागल्यावर दाखवली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पर्रीकर यांनाही सातत्याने त्यांच्यावर दबाव आणणार्या ख्रिस्ती आमदारांना संयम राखा, असे सांगावे लागले.
हिंदूंपेक्षा ख्रिस्तींच्या धार्मिक स्थळांची तोडफोड अधिक झाली असूनही त्यात सापडलेला आरोपी धर्माने ख्रिस्तीच आहे. त्यामुळे यात धार्मिक द्वेष होता, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मग त्याने धार्मिक स्थळांची तोडफोड करण्यामागील कारण काय? सन 2004 पासून झालेली तोडफोड त्यानेच केली होती का? तो एकटाच आहे की त्याचे साथीदार आहेत? त्याला ही कृत्ये करण्यासाठी कुणी उद्युक्त केले आहे का? त्याचा करवता धनी कोण आहे? दक्षिण गोव्यातच हे तोडफोडीचे सत्र का आरंभले गेले? हे शोधून काढायला हवे.
तोडफोड चालू झाल्यावर काहींनी सनातनवर आरोप केले आणि त्याचा संबंध हिंदू अधिवेशनाशीही जोडला. या राज्यात काहींना हिंदू संघटित होत असल्याचे खुपते. कारण हिंदू विखुरलेले असले की, कथित निधर्मी आणि पुरोगामी यांचे फावते. अशा संघटनांनीच परेरा याला हाताशी धरून हे कृत्य केले का? चर्चशी निगडित सीजेएस्जे या ख्रिस्ती संघटनेचे सातेर डिसोझा यांनी गोवा 365 या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रात पोलिसांनी सनातनवर छापा टाकावा, असे सनातनचे नाव घेत सुचवले होते. असाच रोख एका निधर्मी संपादकाने आपल्या संपादकीयातून व्यक्त केला होता, तर द गोवा सिटिझन्स अॅक्शन फोरम या संघटनेने थेट सनातन संस्थेनेच तोडफोड केल्याचा आरोप केला. त्याचबरोबर धार्मिक कलह माजवण्यासाठी सनातनने फौज तयार ठेवल्याचीही गरळओक केली होती. या सर्वांच्या आरोपांमुळे ख्रिस्ती कधीही सनातनविरोधात भडकू शकतात, अशी स्थिती मागील आठवड्यात निर्माण झाली होती. ही भीती फोंडा पोलिसांनाही असावी. त्यामुळेच की काय, त्यांनी स्वतःहून रामनाथी येथील सनातनच्या आश्रम परिसरात गस्त चालू ठेवली होती. या सर्व धर्मांधांनी ख्रिस्तींना भडकावण्याचा प्रयत्न केल्याची सरकारने नोंद घ्यायला हवी आणि त्यांच्यावर कडक कारवाई करायला हवी. परेरा याचा बिलिव्हर्सशी संबंध असल्याचाही संशय आहे. बिलिव्हर्सवाले मूर्तीपूजेवर विश्वास ठेवत नाहीत. हिंदूंचे धर्मांतर करणे आणि गुंडगिरी करणे यांसाठी ही संघटना (कु)प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वी सांकवाळ येथील एका हिंदूने बिलिव्हर्सवाले अवैधरीत्या प्रार्थना घेतात अशी तक्रार पोलिसांकडे केली होती. त्यावरून बिलिव्हर्सवाल्यांनी त्याला बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण केल्याचे प्रकरणही ताजे आहे. सनातनने द गोवा सिटिझन्स अॅक्शन फोरम या संघटनेविरोधात फोंडा पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. त्याचीही सरकारच्या वतीने तातडीने दखल घेतली जावी आणि तोडफोड प्रकरणाची पाळेमुळे खणून काढावीत, हीच अपेक्षा!
– अभय वर्तक
प्रवक्ता, सनातन संस्था, 7775858387