हिंदू जनजागृती समितीचा आरोप

0

पुणे । सनबर्न फेस्टिव्हलच्या आयोजकांनी सरकारला चुकीची माहिती पुरवून कोट्यावधींचा कर बुडवल्याचा आरोप हिंदू जनजागृती समितीकडून बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आला. गेल्या वर्षी पुण्याजवळील केसनंद येथे सनबर्न फेस्टिव्हल महोत्सव घेण्यात आला होता. त्यावेळी आयोजकांकडून प्रयोजकांबाबत खोटे प्रतिज्ञा पत्र सरकारला देऊन कोट्यावधींचा कर बुडवल्याचा आरोप समितीकडून करण्यात आला आहे.

याबाबत राज्याचे महसूलमंत्री, पुण्याचे जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर तक्रार करून देखील याबाबत कोणतीही कारवाई न करता सनबर्न फेस्टिव्हलसाठी सरकार आणि प्रशासन पायघड्या घालत आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने केला आहे. दरम्यान, सनबर्न फेस्टिव्हल आयोजनावर सवाल उपस्थित करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळली असून सनबर्न फेस्टिव्हलचा मार्ग मोकळा झाला आहे. स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांचा विरोध असताना देखील गुरुवारी हा कार्यक्रम लवळे येथे पार पडणार आहे.