जळगाव । हिंदु जनजागृती समितीतर्फे भव्र अशा ’हिंदु धर्मजागृती‘ सभेचे आरोजन शिवतीर्थ मैदान रेथे रविवार 19 नोव्हेंबर रोजी करण्रात आले होते. रासभेबाबत सोशल मिडीरा, पत्रकांद्वारे जनजागृती करण्रात आली होती. राभव्र अशा हिंदु धर्म जागृती सभेनिमित्त शिवतीर्थ मैदानांवर भगवे झेंडे लावण्रात आले होते. तसचे मुख्र गेटवर ‘हिंदु धर्मजागृती संस्थे‘चे विविध प्रकाशानांचे स्टॉल लावण्रात आले होते. हिंदु बांधव रा सभेसाठी मोठ्या उत्साहाने रेत होते. सभामंडपात जर श्रीरामचा नारा देतच प्रवेश करतांना दिसत होते. हर हर महादेव, छत्रपती शिवजी महाराजांचा विजर असो, जरतु जरतु हिंदुराष्ट्रम् अशा गगन भेदून टाकणार्रा घोषणांनी परिसर दणाणून
गेला होता.
रा सभेला प्रमुख वक्त म्हणून हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीर सचिव अॅड. संजीव पुनाळेकर, माजी सल्लागार केंद्र शासन सांस्कृतीक विभाग प्रा. रामेश्वर मिश्रा, प्रखर हिंदुतत्ववादी सुधाकर चर्तुवेदी, सनातन संस्थेचे सद्गुरू नंदकुमार जाधव, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट हे उपस्थित होते. हिंदू महिला व अल्पवयीन मुलींवरील अत्याचार लव्ह जिहाद, आतंकवाद, दंगली, गुन्हेगारी या सर्व समस्यांविषयी हिंदूंमध्ये जागृती करून त्यांना सुरक्षित करण्यासाठी समितीकडून आयोजित या हिंदू धर्मजागृती सभेला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, विविध राजकीय पक्षांचे नेते यांच्यासह एक सहस्त्राहून अधिक धर्मभिमानी हिंदूंनी उपस्थिती लावून आपल्या संघटन शक्तीचा अविष्कार दाखविला.
बेजाबदार प्रसारमाध्यमांमुळे सनातनच्या साधकांचा बळी
हिंदू धर्म जागृती सभेची सुरूवात शंखानाद करून करण्यात आली. यानंतर संत नंदकुमार जाधव यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले तर जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांमध्ये प्रा. रामेश्वर मिश्रा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आली. यानंतर मान्यवारांच्या हस्ते ‘डॉ. जयंत आठवले यांच्या छायाचित्रमय जीवनदर्शन‘ या पुस्तकाचे प्रदर्शन करण्यात आले. प्रा. रामेश्वर मिश्र यांच्या हस्ते सनातन पंचांग 2018 च्या अँड्रॉईड अॅप्लिकेशनचे अनावरण करण्यात आले.
या हिंदू धर्म जागृती सभेत नंदकुमार जाधव यांनी प्रसार माध्यमांच्या बेजबाबदार प्रसारणामुळे तसेच पुरोगाम्यांमुळे सनातनच्या साधकांचा बळी जात असल्याचा आरोप केला. सनातनही संघटना लोकांमध्ये दहशतवाद निर्माण करते हेच रुजवणे ही काँग्रेसची निती असल्याचे स्पष्ट केले. कितीही मुस्कटदाबी केली गेली तरी 2023 ला हिंदू राष्ट्र बनणारच असे ठामपणे त्यांनी सांगीतले. प्रा.रामेश्वर मिश्र यांनी हिंदूराष्ट्र निर्मीतीसाठी प्रत्येकाचे योगदान हवे असे उपस्थितांना आवाहन केले. यावेळी प्रशांत जुवेकर यांनी गोवा राज्यात मडगावला बॉम्बस्फोट त्यांना अटक करण्यात आल्याचे सांगितले. या बॉम्बस्फोटात एटीएसने हिंदू संघटनेला गृहीत धरून जुवेकर यांना भुसावळ रेल्वे स्थानकात बेड्या ठोकल्या आणि गोवा पोलीसांनी कशा प्रकारे त्यांना नरकयातना दिल्या याचे कथन केले.
हिंदू राष्ट्रासाठी दिली प्रतिज्ञा
सुधाकर चतुर्वेदी यांनी गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज बाकी राहिले. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी एटीएसने 9 दिवस छळ केला. आम्ही दिवाळीला कधी फटाके नाही फोडले आणि आमच्यावर बॉम्बस्फोटाचा आरोप ठेवण्यात आला. भगवा आतंकवाद हा शब्द शरद पवार,सुशिलकुमार शिंदे आणि पी.चिदंबरम यांनी निर्माण केला. हिंदू आतंकवादी बनले तर हिंदूनां त्रास देणारे शिल्लक राहणार नाहीत.देशात पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयचे एजंट आहेत.त्यांनीच दाभोळकर, पानसरे यांची हत्या केली.सखोल चौकशी केल्यास ते समोर येईल.अन्य धर्मियांचा विरोध नाही . पण युपीए सरकारने 9 वर्ष हिंदूत्ववाद्यानां डांबले यामुळे भविष्यात होणाया निवडणुकांमध्ये कोणाला निवडून द्यायचे याचा विचार केला पाहिजे.असे सांगुन जो पर्यंंत हिंदू राष्ट्र होणार नाही तो पर्यंत गोड अन्नाचे सेवन करणार नाही अशी जाहिर प्रतिज्ञा त्यांनी केली.
यांची होती उपस्थिती
महंत रणजीशपुरीजी महाराज, ह.भ.प. मुकुंद महाराज धर्माधिकारी, भाजपचे आमदार सुरेश भोळे , जळगाव जिल्हा बार कौंसीलचे अध्यक्ष अधिवक्ता आर.आर. महाजन, उपाध्यक्ष अधिवक्ता मिलींद बडगुजर, विश्व हिंदु परिषदेचेे देवगिरी प्रांताचे सहमंत्री ललित चौधरी,महानगरपालिकेचे गटनेते सुनील माळी, माजी नगरसेवक कैलास सोनवणे, शिवसेनेचे गजानन मालपुरे, बहुभाषिक ब्राह्मण संघाचे श्रीकांत खटोड, शिवसेनेच्या मंगला बारी, भाजपा नगरसेवक ज्योती चव्हाण, नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्यासह अनेक मान्यवर सभेला उपस्थित होते. दरम्यान, पोलीसांच्या सुरक्षा व्यवस्थेबरोबर कार्यकर्त्यांची स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था सभेवर लक्ष ठेवून होती. लक्ष ठेवण्यासाठी नाईट व्हीजन असलेल्या दुरबीणीचा उपयोग करतांना हे कार्यकर्ते दिसून आले. प्रवेशव्दाराजवळ भारतीय बाल संस्कृती संदर्भात बालकांची वेशभुषा करून धर्म जागृतीच्या घोषणा दिल्या.