हिंदू विद्यार्थ्यांवर जबरदस्तीचा रमजानचा रोजा

0

नवी दिल्ली। सोशल मीडियात रोज अनेक मेसेज, फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. या व्हायरल मेसेज, फोटो आणि व्हिडिओच्या माध्यमातून थक्क करणारे अनेक दावे केले जातात. सध्या असाच एक मेसेज व्हायरल होत असून, यातून उत्तर प्रदेशमधील अलीगड मुस्लीम विद्यापीठातील हिंदू विद्यार्थ्यांना जबरदस्तीने रमजाने रोजे (उपवास) करावे लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच मुस्लीम विद्यार्थ्यांसोबतच इतर विद्यार्थ्यांना पहाटे 3 वाजताच सकाळचा नाश्ता दिला जातो. यानंतर त्यांना दिवसभर काही दिले जात नाही. असेही सांगण्यात आले

या मेसेजची सत्यता पडताळण्यासाठी प्रसिद्धीमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी अलीगड मुस्लीम विद्यापीठाला भेट दिली.या प्रतिनीधींनी सर सैय्यद हॉल या वसतिगृहाची पाहाणी केली, त्यावेळी दुपारच्या जेवणाच्या वेळेस विद्यार्थ्यांच्या गर्दीने भरणारे कॅन्टीन रिकामे असल्याचे पाहायला मिळाले. यानंतर अधिक चौकशी करण्यासाठी डायनिंग हॉलचे इंचार्ज शमशुद्दीन यांची भेट घेतली. यावेळी शमशुद्दीन यांनी सांगितलं की, या कॅन्टीनमध्ये इतर दिवशी सकाळी 7 ते 9 नाष्टा, दुपारी 12 ते 2.30 जेवण उपलब्ध असते. पण रमजानचे उपवास सरू असल्याने विद्यार्थ्यांना भल्या पहाटेच नाष्टा आणि जेवण दिले जाते. त्यानंतर या प्रतिनिधींनी मुस्लीम सोडून इतर समाजातील विद्यार्थ्यांची भेट घेतलीं. यात राजेश्‍वर नावाच्या विद्यार्थ्याने सांगितले, सकाळचा नाष्टा, आणि दुपारचे जेवण विद्यापीठाच्या कॅन्टीनमध्ये उपलब्ध नसते.

विद्यार्थ्यांच्या या गैरसोयीमुळे विद्यापीठ प्रशासनाने मुस्लीम सोडून इतर विद्यार्थ्यांसाठी काय सुबिधा केली आहे का? याची माहिती घेण्यासाठी विद्यापीठाच्या जनसंपर्क विभागाशी संपर्क साधला. त्यावेळी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी ओमर पीरजादा आणि इतर अधिकार्‍यांनी बोलण्यास नकार दिला. पण पीरजादा यांनी उप कुलगुरुंशी चर्चा केल्यानंतर, प्रसार माध्यमांशी बोलण्याची तयारी दर्शवली. पीरजादा यांनी सांगितलं की, विद्यापीठातील जे विद्यार्थी उपवास करत नाहीत, ते इतर विद्यार्थ्यांच्या सहमतीने एक-दुसर्‍यांसोबत राहतात.

वास्तविक, प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी व्हायरल मेसेजची सत्याता पडळण्यासाठी जेव्हा अलीगड विद्यापीठात दाखल झाले, तेव्हा विद्यापीठात मोठा गोंधळ उडाला होता. यानंतर विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ रमजानच्या काळातही जेवण आणि नाश्त्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली. प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी विद्यापीठात 1 वाजता दाखल झाले होते. त्यानंतर 2 वाजून 7 मिनिटांनी विद्यापीठ प्रशासनाने नवा आदेश काढून जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. त्याची माहिती विद्यापीठाने मेलद्वारे प्रसार माध्यमांनी दिली. या मेलमध्ये, विद्यापीठाने, उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होईपर्यंत विद्यापीठातील विद्यार्थ्यांना दुपारचे जेवण उपलब्ध करून दिले जाईल, असे सांगितले.