नवी दिल्ली-राम मंदिरासाठी अध्यादेश काढणार नाही, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुलाखतीत सांगितले. त्यांचे हे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेला (विहिंप) पटल्याचे दिसत नाही. विहिंपने दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन राम मंदिरासाठी न्यायालयाच्या निर्णयाची जगाच्या अंतापर्यंत वाट पाहायची का असा सवाल केला आहे. सुमारे ६९ वर्षांपासून राम मंदिराचा प्रश्न न्यायालयात आहे. अनंत काळापासून हे प्रकरण प्रलंबित आहे. हिंदू समाज न्यायालयाच्या निर्णयाची आणखी प्रतिक्षा करू शकत नाही. कोणत्याही परिस्थितीत याच अधिवेशनात राम मंदिरासाठी कायदा व्हावा असे प्रयत्न आम्ही करत असल्याचे विहिंपकडून स्पष्ट करण्यात आले.
हे देखील वाचा
संसदेद्वारे कायदा बनवून राम मंदिर उभारणीचा मार्ग प्रशस्त करायला हवा. ३१ जानेवारीला प्रयागराज येथे धर्मसंसद होईल. त्यात ही मागणी पूर्ण करण्यासाठी काय पाऊल उचलले पाहिजे याचा निर्णय घेतला जाईल. संत जे सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य आहे. राम मंदिरवरील आमच्या लढ्यास यश येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त कला.