हिंस्त्र प्राण्याने पाडला 8 बकर्‍यांचा फडशा

0

चाळीसगाव । गेल्या 5 महिन्यांपासून तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घालुन त्यात अनेक जनावरांचा बळी जावुन 5 जण जखमी होवुन आतापर्यंत 7 जणांचा बळी बिबट्याच्या हल्ल्यात गेला आहे शार्प शुटर व वनविभागाच्या पथकाने 9 रोजी तालुक्यातील वरखेडे येथे गोळी घालुन ठार मारल्याने दिलासा मिळाला असला तरी त्याच रात्रीच्या वेळी तालुक्यातील पिंपरखेड शिवारातील शेतात असलेल्या शेतातील 8 बक-या हिंस्र प्राण्याने फस्त केल्याने परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे.

तालुक्यातील पिंपरखेड येथील आनंदा नामदेव मुलमुले यांचे पिंपरखेड शिवारात शेत असुन शेतातील पत्री शेड मध्ये 6 मोठ्या बकर्‍या व त्यांचे 8 मोठाली पिले त्या आजुबाजुला जाळी मारलेल्या शेड मध्ये बांधलेले असतांना 9 व 10 रोजीच्या रात्री हिंस्र प्राण्याने त्यातील 40 हजार रुपये किमतीचे 8 बकरीचे पिल्ले जखमी केल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे त्यातील ब-याच पिलांचा शरीराचा काही भाग खाल्लेला आहे आज दिनांक 10 रोजी पहाटे 6 वाजेच्या सुमारास आनंदा मुलमुले हे नेहमी प्रमाणे परिवारासह शेतात गेले असता त्यांना हा प्रकार समजला त्यांना विचारणा केली असता कुठल्यातरी हिंस्र प्राण्याने हल्ला केला असावा, अशी माहिती त्यांनी दिली. गेल्या 6 महिन्यांपासुन बिबट्याच्या हल्ल्याने तालुका भयभीत झाला होता त्यात वरखेडे, दरेगाव, उंबरखेड, उपखेड, पिलखोड आदी गावासह गिरणा पट्यातील गावे या हल्ल्यामुळे भयभीत झाली होती दिनांक 9 रोजी रात्री 10-15 वाजेच्या सुमारास हैद्राबाद येथील शार्प शुटर व वनविभागाने बिबट्याला गोळ्या घालुन ठार केल्याने दिलासा मिळाला होता मात्र पुन्हा त्याच रात्री पाटणादेवी अभयारण्य जवळ असलेल्या पिंपरखेड शिवारातील शेतात हिंस्र प्राण्याने बकर्‍यांवर हल्ला केल्याने पुन्हा भितीचे वातावरण पसरले आहे.