हिंस्र प्राण्याने पाडला निलगायचा फडशा

0

नांद्रा । येथुन जवळच असलेल्या रेल्वे पुलाजवळील मुरलीधर माधवराव पाटील यांच्या शेतात बिबट्या सदृश हिंस्र प्राण्याने निलगाय(रुई) ला जवळजवळ 200 मिटर अंतर शेतात फडशा पाडला आहे. या घटनेमुळे परीसरातील शेतकरी वर्गात कमालीची भयभीत झाले आहे. हिस्र प्राण्याचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. नांद्रा येथिल नागपट्टी व सोनटेक शिवारातील ही घटना घडल्याने शेतकर्‍यांनी सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे. 30 डिसेंबरला त्या पुरण्यात आले. याप्रसंगी वनविभाचे कर्मचारी पोलिस पाटिल किरण तावडे, ग्रा.प.सदस्य योगेश सुर्यवंशी, गणेश सुर्यवंशी, मोहन पाटील, रमेश माधवराव पाटील व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.