मुंबई : ‘अक्षरा’ या नावाने घरोघरी पोहचलेली टीव्ही सिरीयलमधील अभिनेत्री हीना खानने ‘बिग बॉस सीजन ११’ मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेत बरीच प्रसिध्दी मिळवली होती. आता सध्या ‘कसौटी जिंदगी की’ या मालिकेत तिने साकारलेली कोमोलिका ही व्यक्तीरेखादेखील खूपच लोकप्रिय ठरली. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.
हिना खानच्या आगामी चित्रपटात फरिदा जलाल आजीची भूमिका साकारणार आहे. सेट वरचा एक व्हिडिओ हीना खानने सोशल मीडियावर शेअर केलाय. तो व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होत आहे.