गुवाहाटी-इंडोनेशियात पार पडलेल्या आशियाई खेळांमध्ये अॅथलेटिक्समध्ये ३ पदकांची कमाई केल्यानंतर करणाऱ्या हिमा दास पहिल्यांदाच घरी येत आहे. घरी येत असतांना गुवाहटी विमानतळावर अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. हिमाच्या स्वागतासाठी विमातळावीरल कार्पेटला रनिंग ट्रॅकचे स्वरुप देण्यात आले होते. या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आशियाई खेळांमध्ये पदकाची कमाई केल्यानंतर हिमा पहिल्यांदा आपल्या घरी येत आहे.
आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हिमा दासचे विमानतळावर उपस्थित राहून स्वागत केले. मुख्यमंत्री कार्यालयातर्फे हिमाचा आज विशेष सत्कार करण्यात येणार आहे. भारतात आल्यानंतर हिमा व अन्य खेळाडूंनी क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती.