हिरापुर ग्रामपंचायत निवडणूक 73 टक्के मतदान

0

चाळीसगाव । तालुक्यातील हिरापुर ग्रामपंचायत निवडणुक सरपंच व 3 सदस्यपदासाठी 73 टक्के मतदान झाले असुन 28 मे रोजी सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. एकुण 11 सदस्य व सरपंच पदासाठी निवडणुक असल्याने आगोदर 8 सदस्य बिनविरोध निवडुन आल्याने सदस्य पदाच्या 3 जागेसाठी 7 उमेदवार रिंगणात होते.

अनुसूचित जमाती साठी आरक्षीत असलेल्या सरपंच पदासाठी पदमा रविंद्र मोरे, रंजना आबा वराडे व अपक्ष म्हणुन लिलाबाई धनराज पवार या उमेदवार होत्या. एकुण 3090 मतदार असुन त्यात 1489 स्री मतदार तर 1601 पुरुष मतदार होते आज झालेल्या मतदानात 1088 स्री तर 1171 पुरुष असा एकुण 2259 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरपंच व सदस्य असे एकुण 10 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले असुन त्याचा फैसला सकाळी 10 वाजता होणार आहे. निवडणूक अधिकारी म्हणुन तहसिलदार कैलास देवरे व सहाय्यक म्हणुन नायब तहसिलदार नानासाहेब आगळे आणि निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन पंचायत समिती विस्तार अधिकारी आप्पासाहेब राठोड यांनी कामकाज पाहीले.