हिरापूर रोडवरून अज्ञातांकडून मोटारसायकल लंपास

0

चाळीसगाव । शहरातील हिरापूर रोड वर असलेल्या सुयश लॉन्स समोरून अज्ञात चोरट्याने 21 मे 2047 रोजी दुपारी 2 ते अडीच वाजेच्या दरम्यान 20 हजार रुपये किमतीची हिरो डिलक्स मोटारसायकल चोरून नेली असून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला 1 जून 2017 रोजी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रामदास सरीचंद राठोड (50, रा. गाळण ता. पाचोरा) यांची 20 हजार रुपये किमतीची हिरो डिलक्स मोटार सायकल क्र एम एच 19 सी बी 7739 हि अज्ञात चोरटयांनी हिरापूर रोड वरील सुयश लॉन्स समोरून दुपारी 2 ते अडीच वाजेच्या दरम्यान चोरून नेली आहे. या प्रकरणी त्यांचे फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन ला अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार शशिकांत पाटील करीत आहेत.