हिरा प्रतिष्ठानचे प्रा.डॉ.रवींद्र चौधरी, रेखा चौधरी यांचे औदार्य

0

नंदुरबार । हिरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चौधरी आणि त्यांच्या भगिनी तथा संचालिका रेखा चौधरी यांनी आईचा आधार गमावलेल्या एका मुलीला शैक्षणिक आधार देण्याचे मोठेपण जपण्याबरोबरच तिच्या लग्नालाही आर्थिक हातभार लावण्याचे औदार्य दाखविले आहे.

सामाजिक कार्याचे कौतुक
2017 च्या डिसेंबर महिन्यात सरला सोमनाथ कोळी या महिलेचा विजेचा धक्का बसून अपघाती मृत्यू झाला होता. त्यामुळे त्यांची मुलगी पूनम सोमनाथ कोळी हिचा प्रमुख आधार गमावला होता. संभाजी नगरातील हमालवाड्यातील या गरीब कुटुंबाला कोणी आधार नसल्यामुळे हिरा प्रतिष्ठानच्या संचालिका रेखा चौधरी यांनी हे वृत्त कळताच पूनम कोळी या मुलीला मानसिक आधार दिला. तिच्या शैक्षणिक खर्चाची तजवीज केली. स्वतः जातीने तिच्या शैक्षणिक गरजांची पूर्तता केली. दरम्यान त्या मुलीचा विवाह निश्‍चित झाला म्हणून हिरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. रवींद्र चौधरी यांनी पुढाकार घेवून तिला आर्थिक मदत दिली. याप्रसंगी प्रा.डॉ. रवींद्र चौधरी, संदीप चौधरी, जितेंद्र गोसावी, अतुल शाह, प्रफुल पाटील, दिलीप चौधरी, जयेश चौधरी, मल्हारी माने आदी उपस्थित होते. प्रा. डॉ. चौधरी यांच्या या सामाजिक कार्याचे कौतुक होत आहे.