हिरा व्यापारी उदानी यांच्या हत्येप्रकरणी ‘या’ टीव्ही अभिनेत्रीला पोलिसांनी घेतले ताब्यात !

0

नवी दिल्ली- हिरा व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या रहस्यमय हत्येनंतर आता मुंबई पोलिसांनी राजकीय क्षेत्राशी संबंधित असलेल्या सचिन पवारला अटक केली आहे. दरम्यान मॉडल आणि टीव्ही अभिनेत्री देबोलिना भट्टाचार्यला देखील विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले आहे. सचिन पवार मृत उदानी यांच्या परिचयाचा मानला जातो. ते आधी भाजपशी संबंधित होते.

तीन दिवसापूर्वी उदानी यांचे मृतदेह रायगड जिल्ह्यातील जंगलात आढळून आले होते. अभिनेत्री देबोलिना भट्टाचार्य यांना विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेण्यात आले असून आणखी काही मनोरंजन आणि उद्योग क्षेत्रातील महिलांना विचारपूस करण्यासाठी बोलविले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

उदानी (५७) आपल्या कार्यालयातून २८ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाले होते. त्यानंतर पोलीस त्यांचा शोध घेत होती.