धुळे : येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अस्वच्छतेच्या समास्यांमुळे नागरिक आणि रुग्ण हैराण झाले आहेत. या अस्वच्छतेमुळे उपचार घेणार्या रुग्णाबरोबर नातेवाईकांच्या आरोग्याला देखील धोका असल्याने रुग्णालयात स्वच्छतेसाठी प्रयत्न करावे.
यासाठी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. गुप्ता यांना निवेदन देण्यात आले. स्वच्छतेसाठी कर्मचारी कमी असल्याने त्रास सहन करावा लागत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी नगरसेवक संदिप पाटोळे, कुंदन पवार, दिनेश आटोळे, रवींद्र शिंदे, वर्षा हिरे, दिनेश चव्हाण, पप्पु चौधरी, सुरेश मराठे आदी उपस्थित होते.