‘ही’ संधी दीपिकालाही मिळाली असती

0

मुंबई : भारताचा सुपरहिट दाक्षिणात्य चित्रपट ‘बाहुबली’ने भारताच्या सिनेसृष्टीची व्याख्याच बदलली. या चित्रपटात काम करण्याची संधी मिळावी अशी अनेक कलाकारांची इच्छा असणार. ही संधी दीपिकालाही मिळाली असती.

‘कॉफी विथ करण’च्या शोमध्ये दिग्दर्शक एस. एस. राजामौली, प्रभास आणि राणाने हजेरी लावली होती. यावेळी बाहूबली जर हिंदीत चित्रीत झाला असता आणि बॉलिवूडची कोणती अभिनेत्री देवसेनाच्या भूमिकेसाठी तुम्ही निवडली असती? असा प्रश्न करणने केला. आपण दीपिकाची निवड केली असती, असं राजामौली यांनी म्हटलं.