हुंड्याच्या पैशांसाठी जळगावात विवाहितेला मारहाण

जळगाव : हुंड्याच्या पैशांसाठी दौलत नगरातील विवाहितेला शिविगाळ व मारहाण करून छळ करण्यात आला. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
शहरातील मोहाडी रोडवरील दौलत नगरातील माहेर असलेल्या भाविका रवी चेनानी (37) यांचा विवाह उल्हास नगर, ठाणे येथील रवी महेश चेनानी यांच्याशी रीतीरीवाजानुसार झाला. लग्नानंतर काही दिवसांतच पती रवी चेनानी याने विवाहितेला माहेरहून हुंड्यांचे पैसे आणावे यासाठी मागणी केली. दरम्यान, विवाहितेने पैशांची पूर्तता न केल्याने विवाहितेला शिविगाळ करून मारहाण करण्यात आली तसेच जीवे ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. या छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्यात. बुधवार, 22 जून रोजी दुपारी चार वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात पती रवी महेश चेनानी, चुलत सासरे हिरालाल चेनानी, नणंद कंगना अनिल संबवाणी, नंदोई सुनील कटारीया (सर्व रा.उल्हास नगर, ठाणे) यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक जितेंद्र पाटील करीत आहे.