पुणे : पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील पेठ गावात हुंड्यासाठी सुनेला गळफास देऊन मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पूनम ढमाले असं या विवाहितेचं नाव आहे. तिच्या लग्नाला ८ महिनेच झाले होते. नंतर पूनम गर्भवती असताना पती आणि सासरच्या मंडळींनी तिच्याकडे माहेरी जाऊन पैसे आणण्यासाठी तिला जबरदस्ती करायला सुरवात केली.
हुंड्याच्या पैशासाठी आणि गर्भपात करण्यासाठी त्यांच्याकडून पूनमचा शारिरीक आणि मानसिक छळ करण्यात येत होता असा आरोप पूनमच्या नातेवाईकांनी केलाय. अखेर पूनमने या गोष्टीसाठी नकार दिल्याने २७ सप्टेंबरला सासरच्या मंडळींनी तिला गळफास देऊन जिवंत मारलं असा आरोपही तिच्या नातेवाईकांनी केलाय.