हुडको परीसरातून विवाहिता बेपत्ता !

0

जळगाव – पिंप्राळा परिसरातील हुडको येथे राहणाऱ्या 40 वर्षीय विवाहिता घरात कोणालाही न सांगता 30 ऑगस्ट रोजी घरातून निघून गेल्याची नोंद रामानंद नगर पोलीसात करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, शरीफा शेरखान (वय-40) रा. ख्वाजा नगर, हुडको, पिंप्राळा ह्या घरात कोणालाही न सांगता 30 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास घरातून निघुन गेल्या. त्यांची नातेवाईकांना इतरत्र शोध घेतला असून त्या मिळून आल्या नाही म्हणून रामानंद पोलीसात शेरखान अब्दुल खान (वय-42) यांच्या खबरीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.