हुतात्मा राजगुरू जयंतीनिमित्त मशाल मिरवणूक

0

राजगुरुनगर  : हुतात्मा राजगुरू यांच्या 109 व्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या राजगुरुनगर येथे जाणीव परिवार व ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या वतीने मशाल मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते.

हुतात्मा शिवराम हरी राजगुरु हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद भगतसिंग व सुखदेव यांच्यासह 23 मार्च 1931 रोजी हसतहसत फासावर गेले. 24 ऑगस्ट 1908 रोजी जन्मलेल्या राजगुरु यांनी वयाच्या 23 व्या वर्षी भारतमातेसाठी प्राणार्पण केले. त्यांच्या जयंतीनिमित्त जाणीव परिवार गेली 5 वर्षे मशाल मिरवणुकीचे आयोजन करत आहे. यावर्षी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य त्यात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. हुतात्मा राजगुरु पुतळा येथून मिरवणुकीला सुरुवात झाली तर जन्मस्थळी म्हणजेच राजगुरुवाडा येथे मिरवणुकीची सांगता झाली.