‘हुस्न पर्चम’साठी कॅटरिनाने अशी घेतली मेहनत

0

मुंबई : बॉलीवूडची बार्बी डौल कॅटरिना कैफ लवकरच ‘झिरो’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कॅटरिनाचे ‘हुस्न पर्चम’ हे गाणं भरपूर गाजत आहे. मात्र, हे गाणे साकारण्यासाठी कॅटरिनाने कशाप्रकारे मेहनत घेतलीये, याचा एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरलही होत आहे.

‘झिरो’ चित्रपट येत्या २१ डिसेंबरला रिलीज होणार आहे. सध्या शाहरुख खान, कॅटरिना कैफ आणि अनुष्का शर्मा हे तिघेही या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत.