नंदुरबार: येथील 51 वर्षीय पुरुष हृदयावरील उपचारासाठी नाशिक येथे गेलेला होता. तिथे त्या व्यक्तीने कोविड चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती परत येत असून जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात येणार आहे. संपर्कातील 3 व्यक्तीचे विलागीकरण करण्यात आले असल्याची प्राथमिक माहिती जिल्हा रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.