तळोदा : हॅन्डपंपवर पाणी भरण्याच्या वादातून तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथे झालेल्या मारहाणीत अक्षय पाडवी (वय 20) या तरुणाचा खून झाल्याची घटना घडली. घटनेतील दोन्ही आरोपींना पोलीसांनी अटक केली आहे.
तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल गावामधील महेंद्र शिड्या पाडवी (वय 42) हे 28 रोजी रात्री 9 वाजता त्यांच्या घरासमोर जवळच असलेल्या सार्वजनिक हँडपम्पवर पाणी भरण्यासाठी गेले असता अजय वळवी (रा.गणेश बुधावल) याने त्यांना पाणी भरण्यास विरोध करत जीवे मारण्याची धमकी दिली. शिवीगाळ करत असतांना अजय वळवी, महीपाल रामजी वळवी या दोघांनी अक्षय पाडवी यास जीवे मारले.
महेंद्र शिड्या वळवी यांच्या फिर्यादीवरून तळोदा पो.स्टे. ला गु.र नं भा द वि कलम 302, 341, 504, 506, 34 प्रमाणे आरोपी अजय महीपाल वळवी, महीपाल रामजी वळवी रा.गणेश बुधावल या दोन्हीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश केदार करीत आहे.