मुंबई। दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएच्या गोलंदाजी सामना करायला सचिनला आवडत नव्हते. त्याच्या गोलंदाजीवर मी कोणत्या ना कोणत्या कारणाने बाद होत होतो आणि मला हे पक्के समजले होते की, त्याच्या गोलंदाजीच्या वेळी मी नॉनस्ट्रायकिंग एंडलाच उभा चांगला आहे असे समोरच्या फलंदाजाला सांगायचो, असे सचिन तेंडूलकरने सांगितले आहे. सचिन म्हणाला की, मी 1989 पासून खेळायला सुरूवात केली. मी तेव्हापासून कमीत-कमी 25 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गोलंदाजांचा सामना केला. परंतु हॅन्सी क्रोनिएच्या चेंडूंचा सामना करायला मला बिल्कूल आवडत नव्हते.
सचिन तेंडुलकरला दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएने 32 एकदिवसीय सामन्यात केवळ तीन वेळा बाद केले होते. परंतु 11 कसोटी सामन्यात क्रोनिएने सचिनला पाच वेळा तंबूचा रस्ता दाखवला होता. हॅन्सी क्रोनिए एक मध्यमगती जलदगती गोलंदाज होता. आपल्या मजबूत खांद्यामुळे हॅन्सी चेंडू बाउंस करण्याबरोबच त्याला गती प्रदान करत होता. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीचा सामना करणे भल्याभल्या फलंदाजांना कठीण जात होते. आपल्या 24 वर्षाच्या प्रदीर्घ आंतराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीत 1999 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये झालेली कसोटी मालिका सर्वात कठीण अशी मालिका होती असे महान फलंदाज तेंडुलकरने सांगितले.