‘हॅप्पी फिर भाग जायेगी’ प्रेक्षकांच्या भेटीला

0

मुंबई: चित्रपटाचा सिक्वेल काढण्याची सध्या बॉलीवूड मध्ये प्रथा सुरु आहे. बऱ्याच चित्रपटांच्या तर एकापेक्षा जास्त सिक्वेल्स बनविले आहेत. याच पठडीतला अजून एक सिनेमा म्हणजे २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘हॅप्पी भाग जायेगी’ या चित्रपटाने त्यातील सच्च्या विनोदाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आता त्याचा सिक्वेल ‘हॅप्पी फिर भाग जायेगी’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

लेखक दिग्दर्शक मुदस्सर अझीझ याने पेरलेल्या अबोध विनोदाने चित्रपट पाहताना चेहऱ्यावर कायम हसू राहत. ‘हॅप्पी भाग जायेगी’मधील हॅप्पी म्हणजे डायना पेंटी आणि तिचा प्रियकर गुड्डू म्हणजे अली फझल, जो एक गायक आहे, एका आमंत्रणावरून गाण्याच्या कार्यक्रमासाठी चीनला जातात. तिथे हॅप्पी (सोनाक्षी सिन्हा) एक हॉर्टिकल्चर प्रोफेसर असते. भाषेच्या अज्ञानामुळे हॅपी व गुड्डू युनिव्हर्सिटीत नेले जातात व नवीन हॅपीला चँग (जेसन टी), जो एक हिंदी बोलणारा चिनी गुंड आहे, किडनॅप करतो.

मुदस्सर अझीझ याने कथेचा बाज चांगला ठेवला आहे. पटकथा आणि संवाद चित्रपटाची लाईफलाईन आहेत. बऱ्याच उत्कृष्ट वन लाइनर्स यातून अनुभवायला मिळतात. एकंदरीत एखादा चित्रपट पाहून ‘हॅप्पी’ व्हायचं असेल तर ‘हॅप्पी फिर भाग जायेगी’ आवर्जून बघा.