‘हेलन’च्या भूमिकेत दिशा पटानी

0

मुंबई: बॉलिवूडची अभिनेत्री दिशा पटानीने आपल्या अभिनयामुळे आणि सौंदर्यामुळे प्रेक्षकांच्या नजरा तिच्यावर खिळवून ठेवल्या आहेत. आता ती सलमान खानच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटामध्ये वर्णी लागली असून ती पहिल्यांदाच आगळ्यावेगळ्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटामध्ये दिशा, अभिनेत्री हेलन यांच्या रेट्रो लूकमध्ये दिसून येणार आहे. त्यामुळे दिशाच्या चाहत्यांना ती शिमरी ड्रेसमध्ये पाहायला मिळणार आहे.

दिशाच्या या लूकसाठी ६० च्या दशकात सर्कसमधील आर्टिस ज्या पद्धतीचे कपडे घालायचे त्या कपड्यांची डिजाईन आणि हेलन यांनी अॅर्नेजेटिक डान्स परफॉर्मेसमध्ये घातलेल्या ड्रेसची डिजाईन या दोन्ही ड्रेसच्या रचनेवरुन दिशाच्या या ड्रेसची डिजाईन करण्यात आली आहे.