‘हेल्थकार्ड’ पुरविण्यासाठी अमृता टेक्नॉलॉजीला काम

0

पिंपरी : महापालिकेेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये येणार्‍या रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या हेल्थकार्ड मॅनेजमेंट सिस्टिम राबविण्यासाठी अमृता टेक्नॉलॉजी या कंपनीला काम देण्यात आले आहे. स्थायी समितीची सभा नुकतीच झाली. मूळ क रारनाम्यानुसार कंपनीने पाच लाख कार्डांचा पुरवठा पूर्ण केला आहे.

तसेच या कामकाजाची मुदत जुलै 2017 पर्यंत कंपनीकडे होती. पाच लाख कार्ड संपल्यानंतर एक लाख 20 हजार कार्डचा पुरवठा करण्यास आयुक्तांनी मान्यता दिली. दरम्यान, कंपनीला 31 जानेवारी 2018 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. 24 नोव्हेंबर 2017 रोजी एक लाख आणि 20 हजार कार्डचा पुरवठा संपला आहे. त्यामुळे नव्याने करारनामा न करता अंदाजे 20 हजार कार्डचा पुरवठा करण्यासाठी येणार्‍या अंदाजे तीन लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली.