हेल्मेटधारक दुचाकी चालकांना गुलाबपुष्प
पुणे : असोसिएशन ऑफ ओरल अँड मॅक्सीलोफिशियल सर्जन्स ऑफ इंडियाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या रंगूनवाला डेंटल कॉलेजतर्फे आयोजित मुख कर्करोग जनजागृती मोहीम आणि हेल्मेट वापराविषयी मशाल पदयात्रा गुरुवारी काढण्यात आली होती.
सकाळी 10 वाजता आझम कॅम्पसमधूक ही पदयात्रा निघाली. सेव्हन लव्हज चौक, स्वारगेट मार्गे भारती विद्यापीठ डेंटल कॉलेजमध्ये ती विसर्जीत करण्यात आली. प्राचार्य रमणदीप दुग्गल, विभागप्रमुख डॉ. जे. बी. गारडे यांनी मशाल यात्रेचे उद्घाटन केले. विद्यार्थ्यांनी हेल्मेटधारक दुचाकीचालकांना गुलाबपुष्पे दिली तर हेल्मेट नसलेल्या दुचाकीचालकांना अपघाताच्या शस्त्रक्रियांचे फोटो दाखवले. यावेळी ’ये पान हमे इस मोड पे ले आया’ हे मुख कर्करोगावर जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. अपघातात दात तुटणे, जबडा फाटणे, हनुवटी तुटणे याचे प्रमाण अधिक आहे. शस्त्रक्रियांचे पोस्टर घेऊन डेंटिस्ट, विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले.