हैद्राबाद जाण्यासाठी पायपीट करीत जाणार्‍यांच्या मदतीसाठी सरसावले बोदवडकर

0

माणुसकीचे घडले दर्शन : अन्न-पाण्यासह प्रवासाची करून दिली सोय

बोदवड : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जिल्हा लॉकडाऊन झाल्यामूळे हातावर पोट असणार्‍यांची उपासमार होत आहे. लॉकडाऊनमूळे सर्वच उद्योगधंद्यांना टाळे ठोकले गेल्याने कामधंद्यासाठी परराज्यातून आलेल्या नागरीरकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामूळे रोज मजूरी करून न पोट भरणार्‍यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली. या पार्श्वभूमिवर अनेकांनी आपपल्या गावी परतण्याचा निर्णय घेतला. अशातच हैद्राबादहून जळगाव येथे खाजगी कंपनीत कामासाठी 10 ते 12 कामगार आलेले होते. लॉकडाऊनमूळे त्यांनी मूळगावी परतण्याचा निर्णय घेतला. राज्यातील वाहतूक बंद असल्यामूळे ते जळगाव ते हैद्राबाद असे 723 किमी अंतर पायी चालत जाण्यासाठी निघाले. पूढे, 60 किमी अंतर चालत आल्यावर त्यांनी बोदवड येथील मलकापूर रसत्यावरील खंडेलवाल पंपाजवळ रात्री 10:30 च्या सूमारास ते विश्रांतीसाठी थांबले. त्यात मलकापूरकडे जाणार्‍या वाहनांना हात दिला असता कोणाही थांबत नव्हते. यात 20 ते 25 वयाचे तरुण सर्वाधिक होते तर एका व्यक्तीच्या पायाचे ऑपरेशन नुकतेच झाले होते त्याला चालणेही कठीण झाले होते. त्यातच हा सर्व प्रकार बोदवड शहरातील तरुणांना दिसल्यानंतर त्यांची विचारपूस केल्यानंतर या कामगारांना अश्रू अनावर झाले. सर्वच भूकेने व्याकूळ झाले असतांना उपस्थित तरुणांनी त्यांना काही खाद्यपदार्थ आणून दिले व मलकापूरकडे जाण्यासाठी स्व-खर्चाने वाहन कररून दिले व सोबत खाद्यपदार्थाचिही व्यवस्था करून दिली. घरी पोहोचल्यावर फोन लावा, असे बोलत तरुणांनी त्यांना दिलासा दिला.

बोदवडकरांच्या कार्याला सलाम
समीर पिंजारी, जफर शेख, समीर शेख, आसीफ अलाउद्दीन शेख, कलीम शेख, आदिल खान, जाबीर शेख, पप्पू यांच्यासहित युवक वर्ग ऊपस्थित होता. या संकटात जे कोणी रस्त्यावर दिसतील त्यांना ‘माणूसकी धर्म’ जोपासून सढळ हातांनी मदत करण्याचे आवाहन यावेळेस सर्व युवकांनी केले.