लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून पडताळणी ; शहरवासीयांमध्ये सुरक्षिततेची भावना
भुसावळ- आगामी सण-उत्सव व लोकसभा निवडणुकाभा उंबरठ्यावर आल्या असताना जनतेत सुरक्षिततेची भावना निर्माण असावी यासाठी भुसावळ पोलिस दलासह मुंबईच्या रॅपीड अॅक्शन फोसच्या जवानांनी शुक्रवारी शहरातील मिरवणूक मार्गावरून सशस्त्र रूट मार्च (पथसंचलन) केले. या पथसंचलनामुळे सर्वसामान्य नागरीकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली तर उपद्रवींच्या उरात मात्र चांगलीच धडकी भरली.
शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन
भुसावळ शहरातील प्रमुख मार्गावरून पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या नेतृत्वात रॅपीड अॅक्शन फोर्सचे सहाय्यक पोलीस आयुक्त स्वतंत्र कुमार, रमेश वर्मा, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार, रॅपीड अॅक्शन फोर्सचे पोलिस निरीक्षक निताई पॉल, रणविजय कुमार, भुसावळ वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक गंधाले, पोलिस उपनिरीक्षक अनिस शेख यांच्यासह सुमारे 60 कर्मचार्यांच्या सशस्त्र पथकाने वाल्मिक नगर चौक, आठवडे बाजार मार्गे हे पथसंचलन केले.
सराफ बाजारात जवानांचे स्वागत
जामा मशीद चौकात जवान आल्यानंतर राजस्थानी विप्र नवयुवक मंडळातर्फे फराळाची व्यवस्था करण्यात आली. उद्योगपती राधेश्याम लाहोटी, अध्यक्ष तथा रक्षा सुरक्षा एजन्सीचे विनोद शर्मा, जे.बी.कोटेचा, जगदीश अग्रवाल, मोहन भराडिया, अॅड.गोकुळ अग्रवाल, विजय महाजन, सुनील ठाकूर, प्रदीप अग्रवाल, अशोक सराफ, रमण वर्मा, संजय अग्रवाल, पवित्र गरडीया, शब्बीर पठाण, भगवान पाटील, चंदू बेंद्रे, पुंजो सोनवणे, उमाकांत(नमा)शर्मा, राजू अग्रवाल, अनुप अग्रवाल, नितीन शर्मा, मोहनलाल शर्मा, दीपक शर्मा, ब्रिजेश लाहोटी, सोमनाथ चौरसिया आदींनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर जवानांनी पथसंचलन सराफ बाजार, मॉडर्न रोड, जाम मोहल्ला, रजा टॉवर चौक, खडका रोड मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, स्टेशन रोडवरून करीत बाजारपेठ पोलिस ठाणे गाठले.
संवेदनशील गावांमध्ये पथसंचलन
मुंबई बटालियन क्रमांक 102 चे पथक जिल्ह्यात 31 डिसेंबरपासून दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील अतिसंवेदनशील गावांमध्ये पथसंचलन करून जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण केली जात आहे. अत्याधुनिक शस्त्र साहित्यासह सहभागी झालेल्या जवानांना पाहण्यासाठी शहरात मोठी गर्दी झाली होती.