नवी दिल्ली । हॉकी इंडिया लीग (एचआयएल) चे भवितव्य येत्या 24 जुलैला ठरणार आहे, अशी माहीत काही वृत्तसंस्थांच्या मार्फत मिळते आहे. या दिवशी हॉकी इंडियाची वार्षिक बैठक पार पडणार आहे. याच बैठकीत लीगबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच ज्याकंपन्यांकडे या हॉकी लीगची फ्रेंचाइजी आहे, त्या कंपन्यांना जर या लीगमधून बाहेर पडायचे असेल तर त्यांना आपल्या बँकेतील अनामत रक्कमेवर पाणी सोडावं लागणार आहे.
कंपन्यांची मुदत संपली
अजूनपर्यंत कोणत्याच फ्रेंचाइजीने हॉकी इंडियाला कोणतीही अडचण असल्याचे कळवलेले नाही, अशी माहिती एका वरिष्ठ पदाधिकार्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. दरवर्षी या स्पर्धेच्या आयोजनात अडचणी येतात. मात्र असे असले तरीही कोणत्याही फ्रेंचाइजीला या स्पर्धेतून माघार घेता येणार नाही. कारण प्रत्येक स्पर्धे च्या तीन महिनेअगोदर ही माघार घेता येऊ शकते. मात्र आता ती मुदत संपलेली आहे. त्यामुळे आता जर या कंपन्यांनी असे पाऊल उचलले तर त्यांना आपल्या अनामत रक्कमेला मुकावं लागेल.