‘हॉटसिटी’चा पारा एका अंशाने झाला कमी

0

भुसावळ- हॉटसिटीअसलेल्या भुसावळात सोमवारी शहराचे कमाल तापमानाचा पारा थेट 47.6 अंशावर पोहोचल्यानंतर अकोल्याही मागे टाकत भुसावळात राज्यभरात तापमानाच्या बाबतीत चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले तर मंगळवारीदेखील भुसावळ शहराचा पारा 46.9 असल्याचे भुसावळातील केंद्रीय जल आयोगाच्या अधिकृत सूत्रांनी सांगितले. मंगळवारी शहराचे कमाल तापमान 29.9 तर आर्द्रता 40 असल्याचे सांगण्यात आले. वाढत्या तापमानामुळे अंगाची लाहीलाही होत असून अंगातून घामाच्या धारा वाहत असून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी 11 वाजेपासूनच उन्हाच्या तीव्र झळा जाणवत असल्याने दुपारच्या वेळी शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे.