हॉटेलमधील वेटरसह 9 जणांकडून वकिलासह एकाला मारहाण

0

पत्रकार संघटनांकडून मारहाणीचा निषेध ; कठोर कारवाईची मागणी

जळगाव- शहरातील हॉटेल करीश्मा येथे मित्रासह मद्यप्राशनास गेलेल्या वकिल अ‍ॅड. पवन ईश्‍वर खरे रा. हतनूर कॉलनी यांना खोलीत डांबून हॉटेलच्या मालक शाम भंगाळे यांच्यासह वेटर अशा 9 जणांना बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या घटनेची माहिती घेण्यासाठी गेलेल्या पत्रकार संतोष ढिवरे यांनाही मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले असून याचा पत्रकार संघटनांतर्फे निषेध करण्यात आला असून कारवाई जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलीस दलाला निवेदन देण्यात आले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 20 रोजी अ‍ॅड. पवन खरे हे त्याच्या पक्षकारासह हॉटेलमध्ये गेले. याठिकाणी त्यांनी बिलही भरले. यानंतर पुन्हा हॉटेलात आल्यावर खरे यांना वेटरने बिलाचे 120 बाकी असल्याचे सांगितल्यावर त्यांनी तेही भरले. पैसे देत असताना वकील असल्याचे सांगितल्याने काऊंटरवरील तसेच मालक शाम भंगाले यांच्यासह 9 जणांना खोलीत डांबून मारहाण केली. यात गळ्यातील सोन्याची 30 हजार रुपयांची चैन गहाळ झाल्याचे खरे यांनी तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी खरे यांच्या फिर्यादीवरुन शाम भंगाळे, चौधरी नामक व्यक्तीसह 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पत्रकार संघटनांकडून निषेध
पत्रकार संतोष ढिवरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध करून आरोपींना तात्काळ अटकेसह दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रविण सपकाळे, कार्याध्यक्ष शरद कुळकर्णी, उपाध्यक्ष नरेश बागडे, भारत ससाणे, रितेश माळी, शैलेश पाटील, ज्ञानेश्‍वर पाटील, दीपक सपकाळे, इम्रान शेख, चेतन निंबोळकर, एस.पी. सुरवाडे, मुकेश जोशी, स्वप्नील सोनवणे, दीपक पाटील आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघातर्फे संशयितांना अटक करावी, कडक कारवाई करण्यात यावी यासाठी जिल्हाध्यक्ष भगवान सोनार यांच्यासह पदाधिकार्‍यांनी पोलीस अधीक्षकांनाही निवेदन दिले.