धुळे। शहरातील पाचंकदिल परिसरात असलेल्या चैनीरोडवरील हॉटेल सागरवर अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या पथकाने छापा टाकून 68 हजार 805 रुपये किंमतीचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला. या प्रकरणी दोन जणांविरुध्द आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
चैनीरोडवरील हॉटेल सागरमध्ये बेकायदेशीररित्या दारुसाठा असून तो विक्री केला जात असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांना मिळाल्याने त्यांच्या पोलीस पथकाने काल रात्री हॉटेल सागर येथे छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत आठ हजार 890 रुपये रोख, 60 हजार रुपये किमतीची देशी विदेशी दारु असा एकूण 68 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी हॉटेल मालक संतोष गोपालदास जयस्वाल व हेमंत रमेश सातभाई रा.मोहाडी याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन जणांवर गुन्हा
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम.रामकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या पथकातील हवालदार मुकूंद पाटील, अमोल कापसे, विवेक साळुंखे, विशाल लोंडे, चेतन सोनगीरे, आझाद नगर पोलीस ठाण्याचे हवालार उमेश पाटील, अक्षय चव्हाण, दीपक पाटील, विजय शिरसाठ, कुणाल पानपाटील, पंकज पाटील आदींनी केली.