जळगाव : एमआयडीसी परीसरात असलेल्या हॉटेल काशिनाथ समोर 24 वर्षीय तरूणाचा बेवारस स्थितीत आढळून आला होता. याबाबत एमआयडीसी पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पॅटच्या खिश्यातीलत डायरीच्या आधारे ओळख पटली असून आज जिल्हा सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. रामू प्रेमलाल काटेवार (वय-24) मु. मजिदपूर पो. गंगाझरी ता.जि. गोंदिया हा तरूण गेल्या पंधरा दिवसांपासून जळगाव एमआयडीसीत एका खासगी कंपनीत कामाला होता. शनिवारी 5 मे रोजी जळगाव-औरंगाबाद रोडवर असलेल्या हॉटेल काशिनाथ जवळ रात्री 21.45 पुर्वी मयत झाल्याचे आढळून आले. घटनास्थळ एमआयडीसी पोलीसांनी धाव घेवून मृतदेह जिल्हा सामन्य रूग्णालयात दाखल केले. खिश्यातील डायरी व पाकीट मिळून आल्यानंतर आळेख पटविण्याचे काम एमआयडीसी पोलीस कर्मचारी करत असतांना डायरीच्या आधारे सायंकाळी ओळख पटली होती.
त्यानुसार मयत रामू काटेवारचा मोठा भाऊ देविदास काटेवार हा लहान भावाचा मृतदेह घेण्यासाठी रविवारी सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल झाले. मयत रामू हा अविवाहित असून त्यांच्या पश्चात दोन भाऊ, आई, वडील असा परीवार आहे.