हॉटेल चालकाला तालुका पोलीसांनी केली अटक

शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील एका हॉटेलात बेकायदेशीर दारू विक्री करणार्या हॉटेल चालकाला तालुका पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 3 हजार 130 रूपयांची दारू हस्तगत करण्यात आली. दिपक शिवदास राठोड (वय-41) रा. अर्जुन नगर, जळगाव असे हॉटेल चालकाचे नाव आहे. कोल्हे हिल्स परिसरातील बॉलीवुड हिल्स नावाच्या हॉटेलमध्ये बेकायदेशीर देशी विदेशी दारू विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना मिळाली. त्यानुसार तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक कल्याण सागर, पोलीस नाईक विश्वनाथ गायकवाड, दिपक कोळी, प्रशांत ठाकूर व चालक अशोक महाले यांच्या पथकाने बॉलीवुड हिल्स नावाच्या हॉटेलमध्ये छापा टाकून सुमारे 3 हजार 130 रूपये किंमतीची देशी विदेशी दारू हस्तगत केली आहे. तसेच हॉटेल चालक दिपक शिवदास राठोड याला अटक केली आहे. याप्रकरणी पो.कॉ. भूषण सपकाळे यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीसात गुन्हा दाखल झाला.